Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : भाचीचे लैंगिक शोषण करणारा मजूर ताब्यात

Spread the love

औरंगाबाद – डिसेंबर २०१९ मधे मानलेल्या भाचीला  लग्नाचे अमीष दाखवून लैंगिक शोषण करुन सोडून देणार्‍या आरोपीला एम- वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.फरार असलेल्या काळात आरोपीने अटक पूर्व जामिन मिळवला आहे काय ? याची पडताळणी करुन अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
अक्षय बाबासाहेब कदम (२३) रा. पिंपरखेडा धंदा मजूरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पिडीतेला लग्नाचे अमीष दाखवून पुणे, नगर, पिंपरखेडा येथे नेऊन तिचे लैंगिक शोषण केले होते. आरोपी अक्षय हा पिडीतेच्या आईचा मानलेला भाऊ आहे. या प्रकरणी जानेवारी २०२० मधे एम. वाळूज पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द बलात्काराचा गुन्हा बाखल झालेला आहे.पोलिसांना तेंव्हा पासून आरोपी गुंगारा देत होता. अाज पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना आरोपी शहर परिसरात आल्याची माहिती खबर्‍याने दिली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक प्रिती फड यांनी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पीएसआय फड करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!