Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus effect : औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची ‘एमआयएम’ ची मागणी

Advertisements
Advertisements
Spread the love

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी करोना व्हायरसची दहशत पाहता औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा अशीही मागणी जलील यांनी केली आहे. दरम्यान औरंगाबाद महापालिकेची निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याआधीच आता एमआयएमने कोरोना व्हायरसचा धसका घेत निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. आता ही मागणी मान्य होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisements

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशात आात एमआयएमने करोना व्हायरसचं कारण देत ही निवडणूक पुढे ढकला अशी मागणी केली आहे. इतकंच नाही तर निवडणूक होईपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमावा अशीही मागणी केली आहे. आजच शरद पवार यांचा नाशिक दौराही करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला. नाशिकमध्ये करोनाचे संशयित चार रुग्ण आढळले होते. मात्र त्यांच्यापैकी कुणालाही करोना व्हायरसची लागण झालेली नाही. असं असलं तरीही करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शरद पवारांनी त्यांचा नाशिक दौरा रद्द केला. त्या पाठोपाठ आता एमआयएमने करोना व्हायरसचं कारण देत महापालिका निवडणूक पुढे ढकला अशी मागणी केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!