Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संशयावरून पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात…

Advertisements
Advertisements
Spread the love

अहमदनगर  जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. लेंडेविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील लेंडे हा पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिला जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. पत्नीच्या नातेवाइकाचे निधन झाले असून, ती माहेरी गेली असल्याचे सुनीलने आपल्या आई-वडिलांना सांगितले. त्याच्या मुलांना आई-वडिलांसोबत पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. त्यानंतर रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच अंतरावर जाळून टाकले. त्यानंतर स्वतःहून तो राहाता पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले. सुनील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर छाया हिचा भाऊ सुनील तरस (खैरी निमगाव, श्रीरामपूर) याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक आली, अशी माहिती राहाता पोलिसांनी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!