Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपाला खुले आव्हान , आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. आजच काय आत्ता सरकार पाडून दाखवा…

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपशी असलेली युती तोडून शिवसेनेने काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार बनवून आपला कारभार सुरु केला असला तरी भाजपचे मन अजूनही या सरकारला मानायला तयार होत नाही असेच दिसत आहेत . दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहोत, असे  वक्तव्य करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जाहीर व्यासपीठावरून थेट सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं आहे. मुक्ताईनगरमध्ये बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आमच्या तीन पक्षाचं सरकार व्यवस्थित सुरू आहे. पण विरोधकांच्या पोटात खुटखुटतंय. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. आजच काय आत्ता सरकार पाडून दाखवा. माझं आव्हान आहे.”

Advertisements

दरम्यान महाविकासआघाडी सरकार आपसातल्या मतभेदांमुळेच पडेल, असे धाडसी वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काल केलं होतं. “आम्ही सरकार पाडणार नाही. तसा प्रयत्नही करणार नाही. आपसातल्या मतभेदांमुळे आपोआप त्यांचे सरकार कोसळेल”, असं सांगताना पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं ते म्हणाले. “कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीला नेहमीच तयार असलं पाहिजे. एका रात्रीत तयारी होत नसते.”  एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस होईल, असा उल्लेख केला गेला. या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुक्ताईनगरच्या भाषणात केला. “ऑपरेशन लोटस कसलं करता.. आम्ही लोटलं तुम्हाला. पुन्हा लोटतो”, असं ठाकरे म्हणाले.

Advertisements
Advertisements

मुक्ताईनगरमध्ये महाविकासआघाडीला मिळालेल्या यशाचा उल्लेख करून खडसेंचं नाव मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आज मुक्ताईनगर खऱ्या अर्थाने मुक्त झालं. संकटावर मात करण्याची जिद्द मुक्ताईनगर मध्ये आहे ” दरम्यान ऑपरेशन लोटसविषयी बोलताना भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, राजकीय पक्षाला निवडणुकीची तयारी ठेवावीच लागते. मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. राज ठाकरे यांनी बांग्लादेशींचा मुद्दा लावून धरल्याने ते भाजपबरोबर जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्याविषयी बोलताना तावडे म्हणाले. भाजप मनसेबरोबर इतक्यात तरी जाणार नाही. तशी शक्यता नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!