Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नेरूळमधील २१ मजली इमारतीला आगीने घेरले , अग्निशमन दलाचे सात जवान जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी मुंबईच्या नेरूळ येथील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या २१ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली त्यामुळे या आगीत कोणत्याही नागरिकांची जीवितहानी झालेली नाही. आज सकाळी ७ च्या सुमारास नेरुळमधील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या इमारतीच्या १८ व्या आणि १९ मजल्यावर आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र, ही आग मोठी असल्याने ती विझवणे जिकिरीचे धाले होते. इमारत गगनचुंबी असल्याने ही आग वेगाने पसरत होती. उंचीवरील आग विझवताना अनेक अडथळे येत असल्याने यात शर्थीचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाले. अखेर तीन तासांनंतर, म्हणजेच १०.३० वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!