Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हवा दिल्लीची : मतदानाला उत्साहात सुरुवात पण १० वाजेपर्यंत केवळ ४.३३ टक्के मतदान , ४० हजार जवानांनाच तगडा बंदोबस्त

Spread the love

दिल्ली विधानसभेच्या  ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.  दरम्यान सकाळी १० वाजेपर्यंत फक्त ४.३३ टक्के मतदान झाले असल्याचे वृत्त आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १५,७५० मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील ४७ लाख ८६ हजार ३८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दिल्लीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी दुहेरी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता आणखी एक राज्य भाजपच्या हातून निसटणार की भाजप आपलं कमळ राजधानी दिल्लीत फुलवण्यात यशस्वी होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे. तर दुसरीकडे आपचं सरकार येणार असल्याचा कौल नवी दिल्लीतील जनतेनं दिली आहे. घोडा मैदान लांब नाही अवघ्या ३ दिवसांत म्हणजेच ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. सोशल मीडियावरही पोलिसांची नजर राहणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ नये यासाठी सीएपीएफच्या १९० जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच विशिष्ट विशेष निवडणूक कर्तव्यावर सुमारे ४०,००० जवान तैनात केले आहेत. त्याशिवाय मतदान केंद्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात स्थानिक पोलिसांसह मतदान केंद्रान एक हजार होमगार्ड्स मदत करीत आहेत.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शाहीनबागच्या मुद्द्यावरून  मतांचे ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या भाजपच्या त्रिकूटाची आज, शनिवारी होत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीपुढे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक पूर्ण होईल, असा ठाम विश्वास ‘आप’च्या गोटात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!