Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रेम प्रकरण सहन न झाल्याने मुलीच्या प्रियकराचा वडिलांनी आणि भावाने काढला काटा , दोघेही गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

शहापूरमध्ये  प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या वडिलांनीच कट रचून प्रियकराची हत्या केल्याचे वृत्त आहे. गेल्या २ वर्षांपासून तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या घराच्यांना हे मान्य नसल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने कट रचत लेकीच्या प्रेमाची निर्घृण हत्या केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , निलेश हंबीर नावाच्या तरुणाचं गांडुळगावातील एका तरुणीशी गेल्या २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमाला तरुणीच्या घरातून नकार होता. त्यामुळे त्यांनी स्वतःच मुलीच्या  प्रियकराची निर्दयीपणे हत्या केली. यामध्ये पोलिसांनी आरोपी पिता आणि भावाला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisements

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि , निलेश हंबीर आणि तरुणीच्या प्रेम प्रकरणावरून यापूर्वी घरात वाद झाल्याचं तपासात समोर आलं आहे. दोघांच्या प्रेमावरून दोन्ही घरात मोठा वाद झाला होता. त्या अनुषंगाने किन्हवली पोलीस ठाण्यात दोन्ही नातेवाईकांविरोधात कारवाईदेखील करण्यात आली होती. पण तरी दोघांचे प्रेम प्रकरण सुरू असल्याचे  लक्षात येताच  तरुणीच्या वडिलांकडून हे कृत्य करण्यात आलं. सोमवारी दुपारच्या सुमारास वासिंद इथल्या महाविद्यालयातून परीक्षा देऊन तरुण डोळखांब इथे आली. तिथे निलेश, त्याचा भाऊ दशरथ हंबीर आणि तरुणी एका बाईकवरून गांडुळवाड इथे घरी जाण्यासाठी निघाले. अर्ध्या वाटेमध्ये वाघदरा जंगलाच्या इथे तरुणीचे आरोपी पिता आणि भाऊ प्रियकराला मारण्यासाठी दबा  धरून बसले होते. निलेशची बाईक दिसताच त्यांनी रस्त्यात गाडी अडवली आणि त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला होता. अखेर उपाचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!