Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रजासत्ताक दिन : देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना विविध पुरस्कार जाहीर

Spread the love

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीर जवानांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विविध मोहिमांमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या सहा जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ओराओन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. यापैकी लामा यांनी मणिपूर येथे आपलं इंटेलिजन्स नेटवर्क बळकत करून १४ दहशतवाद्यांना हेरलं.

मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह यांनी मणिपूरच्या जंगलात झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. नायब सुभेदार नरेंद्र सिंह यांनी  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या कारवाईबद्दल शौर्य पुरस्काराने गौरव,  राष्ट्रीय रायफल्समधील  नायब सुभेदार सोमबीर यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. नाईक नरेश कुमार यांनी जम्मू-काश्मीरमधील एका गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधमोहिमेत हुडकून ठार केलं. या मोहिमेत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला होता.  शिपाई करमदेव ओराओन यांनी नियंत्रण रेषेवर ओराओन आपले कसब दाखवले होते . २९ डिसेंबर २०१८ ला सायंकाळी शत्रूकडून बेछूट गोळीबारास सुरूवात झाली. चार दहशतवादी समोरून गोळीबार करत होते. ओराओन यांनी मशीन गनने दहशतवाद्यांना गुंतवून ठेवले. बंकरमध्ये जाऊन त्यांनी नऊ ग्रेनेड फेकले आणि दोन दहतवाद्यांना कंठस्नान घातले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!