Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवाद विरोधी पथकातील ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना राष्ट्रपती पदक

Spread the love

औरंगाबाद येथील दहशतवाद विरोधी पथकातील  वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. २६ जानेवारी २०२० साठी हा पुरस्कार जाहीर झालं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे हे सरळ सेवेमार्फत पोलिस दलात १९९५ ला रुजू झाले आहेत. आपल्या २५ वर्षाच्या सेवेत त्यांनी बृहन्मुंबई, औरंगाबाद शहर , पुणे,  यूएन युनायटेड नेशन मिशन इन साउथ सुदान मध्ये युनायटेड नेशन पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांना आजपर्यंत २२६ रोख बक्षिसे मिळाली आहेत तसेच ५१ प्रशंसापत्र व प्रशस्तिपत्रे प्राप्त झालेली आहेत.

पातारे यांना २०१८ मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे. औरंगाबाद शहरातील गाजलेले  मानसी देशपांडे खून प्रकरण, गेटवे ऑफ इंडिया बॉम्बस्फोट प्रकरण, तालिबान्यांचे कुप्रसिद्ध दरोडेखोर यांच्या विरुद्ध केलेली कारवाई,  खुनासहित  जबरी चोरी, दरोडा,  घरफोडी,  चोरी,  एनडीपीएस केसेस , आंतरराज्य चारचाकी वाहन वाहन चोरी टोळीचा पर्दाफाश , दोन नायजेरियन स्कॅमचा उलगडा या व इतर अनेक प्रकरणांचा यशस्वी तपास करून त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर सेल येथे कर्तव्य पार पाडत असताना महिलांना त्वरित मदतीसाठी ‘वुमन हेल्पलाइन’ व ई-मेल सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत केंद्र चालू करण्यास योगदान दिले आहे.  ‘डिजिटल प्रायव्हसी -सायबर क्राईम’ या विषयावर येथे कार्यशाळेत सहभाग घेऊन त्यांनी प्रशिक्षण घेतले व त्याचा उपयोग सायबर गुन्हे प्रगतीकरिता केला. नोवेंबर २०१५ ते जानेवारी २०१७ या कालावधीत पोलीस निरीक्षक पातारे हे ‘युनायटेड नेशन मिशन इन साउथ सुदान’ मध्ये ‘युनायटेड नेशन पोलीस’ म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘युनायटेड नेशन’ चे मेडल व प्रशंसापत्र ही प्राप्त आहे. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!