Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोना व्हायरस आहे तरी काय ? चीनमधील तीन शहरांना केले सील , भारतामध्येही सतर्कता…

Spread the love

सध्या चीन कोरोना विषाणूच्या संकटामुळे त्रस्त झाला सून आातपर्यंत या व्हायरसने १७ जणांचा बळी घेतला असल्याचे वृत्त आहे.  हा व्हायरस आढळून आलेल्या चीनच्या वुहान  आणि हुआंगगॅंग  या दोन शहरांना खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णतः  सील करण्यात आले आहे. शिवाय लोकांना घराबाहेर पडण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान चीनमधील  या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा ट्रेन आणि विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.या दोन शहरातील २ कोटी लोकांना या बंदचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेची स्थानिक टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून असून  संघटनेच्या स्थानिक प्रतिनिधी गौडेन गालिया यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पथकाने चीनच्या रोग नियंत्रण केंद्राची स्थानिक जैव सुरक्षा प्रयोगशाळा, रुग्णालये आणि विमानतळांचा दौरा केला.

प्रसिद्ध झालेली वृत्तानुसार हा विषाणू वेगाने पसरत असून चीनमधील ५७१ लोकांना याची लागण झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे तर १७ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चीनच्या अधिकाऱ्यांनी सर्वात आधी वुहान शहर बंद केले. या शहराची लोकसंख्या १.१ कोटी रुपये आहे. कोणतंही अत्यंत महत्त्वाचं कारण असल्याशिवाय शहर सोडू नका असे आदेश या लोकांना दिले आहेत. वुहानकडे आणि तेथून येणाऱ्या रेल्वे, रस्ते वाहतून रोखण्यात आली आहे. काही तासांतच वुहानचं शेजारी असणारे शहर हुआंगगँग शहरातील वाहतूकही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शहरात ७५ लाख लोक राहतात. शहरातील सर्व वाहनांची तपासणी होत आहे. सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली आहेत. तिसरं जवळचं शहर झोऊ येथील रेल्वे स्थानकही गुरुवारी रात्रीपासून बंद करण्यात आले आहे.

भारतही चिंताग्रस्त , योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश 

दरम्यान, चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरससंदर्भात भारतही चिंतेत असून योग्य ती खबरदरी घेण्याचे देश जरी करण्यात आले आहेत.  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारताने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तेथून येणाऱ्या लोकांना एका स्क्रीनिंग प्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोना विषाणू हा सापाचा व्हायरस डिसेंबर २०१९ मध्ये अचानक आल्याचे सांगितले जात असून त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. चीनमधून इतरत्रही पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चीनने आपली तीन शहरे बंद ठेवली असली, तरी या व्हायरसला लगाम घालण्यासाठी तो नेमका आला कुठून याचा शोध घेणं सुरू झालं आणि संशोधकांना अखेर धागा सापडलाच…कोरोना व्हायरसचा मूळ स्रोत साप असू शकतो, असा अंदाज संशोधकांनी आपल्या अभ्यासानंतर व्यक्त केला आहे.

कोरोना व्हायर आहे तरी काय ? 

नवीन कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण स्थानिक सीफूड होलसेल मार्केटमधील कामगार किंवा ग्राहक आहेत. चीनमध्ये काही ठिकाणी जिवंत प्राण्यांची विक्री केली जाते, तिथे या व्हायरसची लागण झाली. असे सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या या रुग्णांच्या शरीरातील व्हायरसचे नमुने वैज्ञानिकांनी तपासले आणि व्हायरस आणि इतर प्राण्यांच्या जेनेटिक आणि प्रोटिन कोडची तपासणी केली, तेव्हा तो सापाच्या जेनेटिक आणि प्रोटिन कोडशी मिळताजुळता असल्याचं दिसून आले असून “Journal of Medical Virology” मध्ये  यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

वुहानमध्ये जिथं या व्हायरसचा प्रसार सर्वाधिक झाला त्या परिसरातील चायनीज क्रेट आणि चायनीज कोब्रा हे या व्हायरसचे सोर्स असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. कोरोना वायरस हे नाव व्हायरसच्या आकारावरून पडलं आहे. एखाद्या मुकुटाप्रमाणे, प्रभेसारखा दिसणारा हा व्हायरस आहे आणि तो हवेमार्फत पसरतो.  श्वसनप्रणाली आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनवर परिणाम करतो.  याआधी severe acute respiratory syndrome corona virus (SARS-CoV) आणि Middle East respiratory syndrome corona virus (MERS-CoV) यांनी गेल्या १७ वर्षात शेकडो लोकांचे बळी घेतलेत.  जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील या कोरोना व्हायरसला 2019-nCoVअसं नाव दिलं आहे.

MERS-CoV आणि SARS-CoV या कोरोना व्हायरसला झोनोटिक व्हायरल डिसीज म्हटलं जातं (zoonotic viral diseases) एखाद्या व्यक्तीला या आजाराची लागण थेट प्राण्यांमार्फत होते. मात्र नवीन क्रोनोव्हायरस व्यक्ती व्यक्तींमध्ये पसरत आहे, त्यामुळे गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!