Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुनेवर प्राणघातक हल्ला करणा-या निवृत डीवायएसपी जाधवचा जामीन फेटाळला 

Spread the love

औरंंंगाबाद : सुनेला घरात येण्यास मज्जाव करून शिवीगाळ करत मारहाण करत प्राणघातक हल्ला करणा-या सेवानिवृत्त डीवायएसपी हिरालाल जाधव याचा सह न्यायधीश व्ही. बी. पारगावकर यांनी अटकपूर्व जामीनफेटाळून  लावला.
सेवा निवृत डीवायएसपी हिरालाल रामसिंग जाधव याचे चिरंजीव महेशचे २५ वर्षीय डॉक्टर तरूणीसोबत १८ मे २०१७ रोजी लग्न झाले होते. पती – पत्नीमध्ये वाद होत असल्यामुळे ते दोघे विभक्त राहत असून त्याचा न्यायालयात दावा प्रलंबित असल्यामुळे विवाहिता डॉक्टर जाधव यांच्या सिडको एन -४ परिसरातील पारिजात नगरातील बंगल्यात राहते. डॉक्टरच्या बहिणीचे लग्न ६ डिसेंबर रोजी लग्न असल्यामुळे ती नांदेडला गेली होती. लग्न झाल्यानंतर ९ डिसेंबर रोजी डॉक्टर आपल्या वडिलांसोबत सकाळी दहा वाजता घरी आली. त्यावेळी डॉक्टर विवाहितेस बंगल्यात येण्यास महिला सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी विरोधा दर्शविला.
दरम्यान डॉक्टर विवाहितेस न्यायालयात काम असल्यामुळे ती न्यायालयात गेली. सायंकाळी साडेसहा वाजता परत बंगल्यात जात असताना महिला सुरक्षा रक्षकांनी अडविले, त्याच वेळी काळ्या जीप मधून डॉक्टर विवाहितेचा पती महेश , सासरे हिरालला जाधव आणि सासू हे आले. महेश आई – वडिलांना सोडून निघून गेला. त्यानंतर डॉक्टर विवाहितेस सासरा निवृत डीवायएसपी हिरालाल जाधव आणि त्याच्या पत्नीने शिवीगाळ करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्ल् केला. डॉक्टर विवाहितेच्या तक्रारीवरुन पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!