Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संत गोरोबा कुंभार नगरीत फ्रान्सिस दिब्रेटो यांचे औपचारिक षटकार ….

Spread the love

अ. भा . साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात वर्तमान स्थितीवर भाष्य करून आपल्या भावना निर्भयपणे व्यक्त करताना अनेक प्रश्न उपस्थित केले . आपल्या रोख ठोक भाषणात ते म्हणाले कि ,  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? तसंच दाभोलकर, गौरी लंकेश यांना ठार करण्यात आलं ही कोणती भारतीय संस्कृती आहे?

जेएनयूमधील हिंसाचारावर बोलताना ते म्हणाले कि , अशा घटनांबाबत आम्ही गप्प बसणार नाही. आजचे प्रश्न कोणते? असा मला प्रश्न पडतो.  देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असे  म्हणत त्यांनी याबाबतची खंतही व्यक्त केली. “मी एकदा जर्मनीला गेलो होतो. तिथल्या नागरिकांना मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की होय एक काळ असा होता की आम्ही हिटलरच्या धुंदीत होतो. तशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते. तशीच झडप आपल्यासमोरही आली आहे” असे  म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.

फ्रान्सिस दिब्रेटो हे आज सकाळीच उस्मानाबाद शहरात दाखल झाले परंतु पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने  ग्रंथदिंडीत ते सहभागी होऊ शकले नाही. मात्र संध्याकाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी व्हिल चेअरवर बसून हजेरी लावली. औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांना साहित्य संमेलनाची सूत्रे  प्रदान केली.  या संमेलनाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात फ्रान्सिस दिब्रेटो यांनी मुक्त भाष्य केले.

मराठी भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले कि , “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी वाचन संस्कृती ढासळत असल्याच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली. ” मला गौतम बुद्ध वाचून आयुष्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतो. आपल्या वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. अनेक पालकांना आजच्या घडीला वाटतं की इंग्रजी ही धनाची भाषा आहे. ती धनाची भाषा असेल पण लक्षात ठेवा मराठी ही मनाची भाषा आहे.” असंही दिब्रेटो म्हणाले.

आपल्या साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीवर टीका करणाऱ्यांना उत्तर  देताना ते म्हणाले कि , “मी प्रभू येशूचा उपासक आहे, प्रभू येशू म्हणतात की त्यांना माफ कर ज्यांना माहित नाही ते काय करत आहेत.  मी संतांना मानणारा माणूस आहे. संतांना मी कधीही विसरु शकत नाही खासकरुन माझ्या लाडक्या तुकोबांना. माझी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेकजण माझा सत्कार करण्यासाठी आले. मी त्यांना सांगितले हा खर्च टाळा. मी साहित्याच्या मंदिराच्या पायरीजवळ दिवे लावणारा छोटासा सेवक आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!