Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Happy New Year : मुंबईहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याचा प्रवास आजपासून महागला

Spread the love

मुंबईतून जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीटदरातील वाढ आजपासून लागू केली असल्याचे वृत्त आहे. सर्वसाधारण लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा, बिगर वातानुकूलित मेल आणि एक्स्प्रेससाठी प्रतिकिमी दोन पैसे आणि वातानुकूलित प्रवासासाठीची दरवाढ किमीमागे चार पैसे आहे. यामुळे आजपासून प्रवाशांना दरवाढीची झळ सोसावी लागेल.

या बाबतच्या वृत्तानुसार मेल-एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रति किलोमीटर २ पैसे अधिक मोजावे लागणार आहे. शयनयान आणि प्रथम श्रेणीच्या भाडे शुल्कात प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मेल-एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर ४ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. या दरवाढीनंतर मुंबई-नागपूर तिकीट दरात सर्वसाधारण गाडीसाठी ८ रुपये १६ पैसे, मेल एक्स्प्रेससाठी १६ रुपये ३२ पैसे आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकीटदरात ३२ रुपये ६४ पैशांची वाढ होणार आहे. मुंबई-मडगाव प्रवासासाठी साधारण गाडीसाठी ५ रुपय ८० पैसे, मेल एक्स्प्रेससाठी ११ रुपये ६० पैसे आणि एसी गाड्यांसाठी २३ रुपये २० पैसे वाढणार आहेत.

दरम्यान उपनगरी वाहतुकीस मात्र या दरवाढीतून वगळण्यात आले आहे. मुंबई-सोलापूरकरीता प्रवाशांना साधारण गाडीसाठी ४ रुपय ५३ पैसे, मेल एक्स्प्रेससाठी ९ रुपये ६ पैसे आणि एसी गाड्यांसाठी १८ रुपये १२ पैसे जादा मोजावे लागतील. कोल्हापूरसाठीचा प्रवासदेखील महागला आहे. मुंबईहून कोल्हापूरसाठी आजपासून साधारण गाडीला ५ रुपये १६ वाढणार आहेत. मेल एक्स्प्रेससाठी १० रुपये ३२ पैसे आणि एसी गाड्यांसाठी २० रुपये ६४ पैसे वाढणार आहेत. मुंबई- दिल्लीकरीता प्रवाशांना साधारण गाडीसाठी १३ रुपय ८६ पैसे, मेल एक्स्प्रेससाठी २७ रुपये ७२ पैसे आणि एसी गाड्यांसाठी ५७ रुपये ४४ पैसे जादा मोजावे लागतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!