Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाड्यातील ३० हजार ऊसतोड कामगार महिलांनी काढले आपले गर्भाशय , नितीन राऊत यांनी दिलेली माहिती

Spread the love

गर्भाशय काढणे म्हणजे आपल स्त्रित्त्व संपवणे आहे,  मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या ताफ्यातील  २५  ते ३० वर्षाच्या ३० हजार महिलांनी आपले गर्भाशय काढून घेतले असल्याची  धक्कादायक माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नितीन राऊत हे अमरावतीमध्ये देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते.

राऊत पुढे म्हणाले कि , मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्हा अति मागासलेला आहे. त्या ठिकाणी रोजगार नसल्याने अनेक महिला पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार म्हणून जातात. ऊस तोडणीचे काम हे सहा ते सात महिन्याचे असते. त्यादरम्यान त्यांना मासिक पाळी येते त्यावेळी त्यांना चार दिवस सुट्ट्या घ्यावी लागते आणि त्याचे पैसे त्यांना मिळत नाही  त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. त्यामुळे तेथील तरुण २५ ते ३० वर्षाच्या ३० हजार महिलांनी आपले गर्भाशय काढून घेतले आहे. तसंच गर्भाशय काढणे म्हणजे आपले स्त्रित्व संपवणे आहे, असंही राऊत म्हणाले.  याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून शासनाने योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची २ लाख खाती खाजगी अक्सिस बँकेत उघडली. शासनाची खाती ही राष्ट्रीयकृत बँकेत असतात. मागील पाच वर्षातील निर्णय चुकीचा होता. आम्ही ते दुरुस्त करू असंही नितीन राऊत यांनी सांगितलं. तसंच गृहमंत्रिपद हे शिवसेनेकडे राहणार असल्याचंही यावेळी नितीन राऊत यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!