Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अनेक गैसमज , आंदोलन करा पण कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्या , मुख्यमंत्र्यांचे जनतेला शांततेचे आवाहन

Spread the love

मोदी सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अनेक गैरसमज आहेत  त्यावरून  देशभरात  मोर्चे, आंदोलने सुरू असून हिंसाचारही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. हे काम सर्व पक्षाच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात करायचे आहे. महाराष्ट्र सरकार कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या नागरिकांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करा, मोर्चे काढा, मुख्यमंत्री म्हणून मला येऊन भेटा, पण राज्याच्या शांततेला गालबोट लागेल असे वर्तन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

देशभरात सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असून राज्यातसुद्धा विविध भागांमध्ये या कायद्याला विरोध करण्यासाठी संघटना, विद्यार्थी यांसह आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या परिस्थितीत राज्यात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे न वागता शांत रहा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. हे आवाहन करताना मुख्यमंत्री  पुढे म्हणाले की, “नागरिकत्व सुधारणा कायदा घटनेला अनुसरुन आहे की नाही याबाबत कोर्टाचा निर्णय होणे बाकी आहे. तसेच काहींच्या मनात या कायद्याबाबत भीती आणि गैरसमज आहे. अद्याप कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी कायदा अंमलात आला तर देश सोडावा लागेल असे काहींना वाटते. पण मी त्यांना सांगू इच्छितो की अद्याप कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच कोणाच्याही हक्काला आम्ही धक्का बसू देणार नाही. तेव्हा महाराष्ट्रात शांतता राखा.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!