Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“या” आंतरराष्ट्रीय नेमबाज तरुणीने व्यक्त केली निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याची इच्छा….

Spread the love

देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची चर्चा चालू असतानाच  आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने लिहिलेल्या पात्रात  निर्भयाच्या दोषींना एखाद्या महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. आणि आपण त्यासाठी तयार आहोत असेही तिने या पत्रात म्हटले आहे.

या पत्रात वर्तिका सिंहने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केली असून रक्ताने लिहिलेल्या या पत्रात तिने पुढे म्हटले आहे कि ,  “निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी दिली गेली पाहिजे. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेशा संपूर्ण देशभरात जाईल. महिला कलाकार आणि खासदारांनी माझं समर्थन करावं, यामुळे समाजात बदल घडेल अशी अपेक्षा आहे”.

निर्भयावर  दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार केले होते. या पाशवी अत्याचारानंतर अकरा दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर २९ डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. एका दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली. या प्रकरणी १८ डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणातील फाशीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!