Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” राहुल सावरकर वाद ” : सावरकरांच्या नातूंसह शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतला हा पवित्रा…

Spread the love

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही असे वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनाही आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत” असे  रणजीत सावरकर यांनी म्हटले  आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर म्हणाले की, ” स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, जीव गेला तरीही माफी मागणार नाही असे  राहुल गांधी म्हणाले. ही चांगलीच गोष्ट आहे की राहुल गांधी यांचे आडनाव सावरकर नाही. त्यांचे  आडनाव सावरकर असते तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते”

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या पलटवारावर आता शिवसेना नेते खा . संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि ,  ‘आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. सेनेच्या या भूमिकेमुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून सावरकर यांच्याबद्दल आपली भूमिका मांडताना म्हटले आहे कि ,  विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला, असं राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!