Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास औरंगाबाद , मुंबई महापालिका हातून जाण्याची शिवसेनेला सतावतेय भिती ?

Spread the love

जगदीश कस्तुरे

भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर आगामी महापालिका निवडणूकीत मुंबई महापालिका गमवावी लागेल या भितीने शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या भूमीकेवर ठाम अडून बसली आहे. आणि मुंबई महापिलिकेवरचं शिवसेनेचं वर्चस्व संपूष्टात यायलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा भाजपा बाळगून आहे.

दरम्यान संजय राऊत, रामदास कदम, चंद्रकांत खैरे , अनिल देसाई, सुभाष देसाई, हे शिलेदार उध्दवांबरोबर असले तरी हा फौजफाटा तोकडा असल्याचे पक्षप्रमुखांच्याही लक्षात आले आहे.

विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून दोन आठवडे झाले तरी राज्याचा मुख्यमंत्री पदाचा घोळ अजून कायम आहे. महायुतीतील दोन्ही पक्ष हे विसरले आहेत की,जनतेने मोठ्या विश्र्वासाने त्यांना बहुमत दिले आहे.त्या जनतेच्या मताचा आदर करणे आपले कर्तव्य आहे अशी अनेक सेना नेत्यांचीही इच्छा आहे. कारण शिवसेनेचे चिन्ह आणि सध्या असलेले पक्ष प्रमुख यांचा ताळनमेळ बसंत नाही.

अतिशय संयमीपणा ठेवत उध्दव ठाकरे गाडा हाकलतात खरा पण मायबाप जनतेला ते रुचंत नाही. त्यामुळे राडा संस्कृतीपसंत करणारे शिवसैनिक वैतागल्या सारखे वागतात.शिवसेनेचा दबदबा एक तर पुन्हा निर्माण व्हायलाच हवा नाहीतर ती संघटना गुदमरतेय अनेक पक्षातले वाघ पक्षप्रमुखांची माघारी खिल्ली उडवंत असल्याचे चित्र बर्‍याच वेळेस दिसून येतेय.त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्या ऐवजी महापालिका निवडणूका होई पर्यंत राज्यात राष्र्टपती राजवट लागू व्हावी. आणि महापालिका निवडणूका संपताच भाजपाला पाठिंबा देऊन मोकळे व्हावे.अशी काही अटकळ शिवसेनेत तयार होतेय. हा प्रकार भाजपाच्या ही लक्षात आलाय.त्यामुळे गडकरी उध्दव ठाकरेंशी बोलत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.तसे पाहिले  तर मुख्यमंत्री पदाची पात्रता असणारा एकही नेते शिवसेनेकडे नाही. मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्या तोडीचे नेतेच शिवसेनेकडे नाही.

जोशी थकलेत तर राणे भाजपात गेलेत.उध्दव ठाकरे जरी मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेले दिसत असले  तरी त्यातील पोकळपणा त्यांच्याच नेत्यांनी उध्दवांना दाखवून दिल्याचे कळते.उद्या मुंबई महापालिका आणि औरंगाबाद महापालिका या शिवसेनेच्या ताब्यातून गेल्या तर पक्ष डबघाईला येणार असे चित्र सध्या शिवसेनेसमोर दिसत असल्याचे बोलले जाते. हा अंदाज उध्दव यांना कदाचित यापूर्वीच आल्यामुळे आदित्यला त्यांनी निवडून आणले व शिवसेना किती खोलात आहे याचा अंदाज घेतला असल्याची चर्चा आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!