Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित केवळ मते खाईल पण सत्तेत येणार नाही , सत्तेसाठीच माझा कमळावर लढण्याचा निर्णय : रामदास आठवले

Spread the love

लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडीला चांगली मतं मिळाली. पण मतं खाऊन सत्ता येणार नाही. माझे उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखलंय. सत्तेवर राहावं ही डॉ. बाबासाहेबांची भूमिका होती म्हणूनच आपण भाजपसोबत आहोत.  म्हणजेच सत्तेसोबत आहोत. प्रकाश आंबेडकर वंचित केवळ मते खाण्याचे काम करीत आहेत ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने वंचितांना सोबत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत तर महायुतीसोबत असणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीचा प्रचार करीत आहेत. आपल्या प्रचारात ते सातत्याने प्रकाश आंबेडकर यांच्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि ,  ‘वंचित मतं खाण्याचे  काम करीत आहे. त्यामुळे सत्ता येणार नाही. सत्ता हवी असेल तर माझ्यासारखं पॉलिटिक्स करायला हवं’ भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा थेट भाजपसोबत राहून त्यांनी सत्तेत यावे , असा टोला वजा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना कल्याणमध्ये दिला आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ दादासाहेब गायकवाड मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. भीमा-कोरेगावनंतर प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला. समाजासाठी त्या बंदमध्ये रिपाइंचे कार्यकर्ते सामील झाले. त्यांचा फायदा त्यांना झाला. त्यांची लिडरशिप पुढे आली. पण ऐक्यासाठी आजही मी तयार आहे. प्रकाश आंबेडकरांना पक्षाचे अध्यक्ष करण्याची तयारी आहे, असेही आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडीला चांगली मतं मिळाली. पण मतं खाऊन सत्ता येणार नाही. माझे उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखलंय. सत्तेवर राहावं ही डॉ. बाबासाहेबांची भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अजून दहा वर्ष आपल्या सोबत राहिले असते, तर देशाचे बेस्ट प्रधानमंत्री असते, असेही आठवले म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी मनसे आणि राज ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. ‘राज ठाकरे हे एक चांगले वक्ते आहेत. पण महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसतील, इतके आमदार मात्र त्यांचे निवडून येणार नाहीत’, असं आठवले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!