Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

परतीच्या पावसाने नाशिकला पुन्हा झोडपले , जनजीवन विस्कळीत , कार गेली वाहून

Spread the love

परतीच्या  पावसाने पुन्हा नाशिकला आज पावसाने अचानक जोरदार तडाखा दिला. दुपारी सुमारे सव्वातास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने एक चार चाकी वाहन वाहून गेले असून त्याबाबत अधिक तपशील मिळालेला नाही. दरम्यान काही भागातील झाडे आणि झाडांच्या फांद्या मिथ्या प्रमाणात तुटल्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.

पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे नाशिककरांची एकच तारांबळ उडाली. शहरातील सराफा बाजारात पाणी शिरल्याने उद्भवलेल्या स्थितीचा सामना करताना व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले. सिटी सेंटर मॉल चौकासह शहरातील विविध रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. सिटी सेंटर मॉल येथील सिग्नलजवळ सुमारे तासभर चक्काजामसारखी स्थिती होती.

नाशिक बरोबरच सिन्नर तालुक्यातही आज दुपारी वादळासह जोरदार पाऊस झाला . त्यामुळे मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निफाड, येवला, दिंडोरी, चांदवड, इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांनाही पावसाने झोडपले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसामुळे या भागातील नद्याही ओसंडून वाहत आहेत.

उत्तर मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने आज दुपारी  १ च्या सुमारास व्यक्त केला होता. प्रामुख्याने नाशिक, जळगाव आणि पुणे या भागांसाठी हा इशारा देण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला. अहमदनगर जिल्ह्यात उद्या ७ ऑक्टोबर रोजी काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नाशिक पुणे आणि नगर जिल्ह्यात ८ ऑक्टोबरलाही जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!