Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप- सेनेने नाकारलेल्या आजी -माजी आमदारांना स्वीकारते आहे राष्ट्रवादी

Spread the love

महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात  कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिवसेना किंवा भाजपची उमेदवारी नाकारलेल्या आजी माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देऊन स्वीकारण्याच्याहालचाली अधिक तीव्र केल्या आहेत त्यामुळे राष्ट्वादीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजप सेनेने आपलेसे केले आहे तसे राष्ट्रवादीनेही भाजप -सेनेतील नाराजांना जवळ करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे चित्र आहे.

दरम्यान पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अमित घोडा हे माजी आमदार कृष्णा घोडा यांचे चिंरजीव आहेत. २०१४ साली कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. अवघ्या ५०० मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर एकाच वर्षात त्यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुकीत अमित घोडा आमदार म्हणून निवडून आले होते.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप पक्षाचे माजी खासदार चिंतामन वनगा यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी भाजपने काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चिंतामन वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपने दबाव टाकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानुसार आज वनगा यांना विधानसभेसाठी एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळेच नाराज झालेल्या अमित घोडा यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!