Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : एकनाथ खडसेंची खडखड !! पक्षाकडून कोणतीही दखल नाही , गिरीश महाजन म्हणतात ‘येईल नाव !!’

Spread the love

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपनेते एकनाथ खडसे यांनी  त्यांच्याऐवजी त्यांच्या  मुलीला तिकीट देण्याच्या तयारीत असलेल्या भाजप नेत्यांना आज एका पत्रकार परिषदेत ” मला तिकीट का नाही? असा साधा प्रश्न विचारून एखादा विषय आपल्या आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षाने मला सांगितलं तुम्हाला तिकीट देणार नाही, तुमच्याऐवजी कुणाला द्यायचं हे तुम्ही सांगा. त्यावर मी सांगितलं की आपण काही सांगू शकणार नाही, कारण माझे सारे कार्यकर्ते हे एकनाथ खडसे आहेत.  मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझं समाधान होईल, नाही उत्तर दिलं तरी चालेल. मी काही इतका मोठा माणूस नाही की पक्षाला काही विचारू शकेन.  जो काही पक्ष निर्णय घेईल, तो आपण मान्य करु. शांतता ठेवा.

दरम्यान “एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. आतापर्यंत पक्षाचं खूप ऐकलं. स्वत:च्या राजकारणासाठी स्वार्थी राजकारण करत आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतील”, असा इशारा खडसे समर्थकांनी दिला.  खडसेंची पत्रकार परिषद सुरु होती त्याचवेळी एक कार्यकर्ता अंगावर रॉकेल ओतून घेत होता. त्यावेळी खडसेंनी फोन लावून त्याला टोकाचा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं.

खडसे पुढे म्हणाले कि , तुम्ही ३ दिवसांपासून इथे आहात. आपण सर्वजण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपण पक्षाच्या आदेशाचे नेहमीच पालन करत आलो आहे. मला स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं, तेव्हा एका मिनिटात राजीनामा दिला. पक्षाने मंत्रिपद दिलं, पक्षाने आदेश दिला मंत्रिपद सोडलं. त्यामुळे आपल्या भावना स्वाभाविक आहे. गेली ३० वर्ष तुम्ही मला निवडून देत आहात. भाजपचं अस्तित्व इथे नव्हतंच, अशा परिस्थितीत तुमच्या सहकार्याने पक्ष वाढला.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळालं नाही. त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर  यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतरही खडसे  यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.


गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

दरम्यान, एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. भाजपची आणखी एक यादी येणार आहे त्यात नाव येण्याची शक्यता, भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. यंदा महाराष्ट्र विधानसभा  निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला  ठरला आहे. भाजप १४६, शिवसेना १२४ आणि मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून २ विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!