Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बिल्डरकडून दागिन्यासह १० लाखाची रोकड जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई , मुद्देमाल आयकर विभागाकडे

Spread the love

औरंगाबाद – काल (मंगळवारी) दुपारी ३ वा.पश्र्चिम मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी इटखेड्याच्या बिल्डरला व त्याच्या अकाऊंटंटला १० लाख रु.रोख आणि सोन्या चांदीच्या दागिन्यासहित पकडून तो ऐवज जप्त केला. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी परमित कौरसिंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गणेश कांतीलाल गादिया(३७) रा.इटखेडा आणि इरफानशेख रा.काद्राबाद या दोघांकडून वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला. व तो आयकर विभागाकडे सोपवण्यात आला.भरारी पथकाने अधिक चौकशी करता गणेश गादीया हे बांधकाम व्यावसायिक आहेत.तर त्यांच्या सोबत त्यांचा अकाऊंटंट शे.इरफान होता. पथकाने गादिया यांना रोकड आणि दागिन्यासंबंधित कागदपत्रे आयकर विभागाकडे देण्यास सांगितले. ही रक्कम आणि दागिने ते बॅंकेत जमा करण्यासाठी नेत असल्याचे भरारी पथकाच्या चौकशीत आढळले. पैठण रोडवरील महानुभाव आश्रमासमोर सदर  घटना घडली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून चोरी गेलेला टेम्पो सापडला

औरंंंगाबाद : अवैधरित्या वाळुची वाहतूक केल्याप्रकरणी महसुल विभागाच्या पथकाने जप्त केलेला टेम्पो २९ सप्टेंबरच्या रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून चोरी गेला होता. चोरी गेलेला टेम्पो क्रमांक (एमएच-१७-एजी-२२५५) २ ऑक्टोबर रोजी दिल्लीगेट परिसरातील ग्लोबल इंग्लिश स्वूâलजवळ मिळून आला. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार मुजीब अली, गजानन मांन्टे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, आनंद वाहुळ, तुकाराम राठोड आदींच्या पथकाने चोरी गेलेला टेम्पोंचा शोध घेवून तो जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!