मनोरंजन : शरद गोरेंच्या “ऐैतवी ” या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

पुणे-जी. एस. एम. फिल्म्स निर्मित सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरेंच्या “ऐैतवी ” या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच नारोळी (बारामती) येथे संपन्न झाला भारतीय कला प्रसारणी संस्थेचे सचिव पुष्करदादा पाठक यांच्या हस्ते क्लॅप देऊन शुभारंभं संपन्न झाला. लातूरचे राहूल बळवंत हे मुख्य अभिनेता म्हणून तर सोलापूरची विनिता सोनवणे-मुख्य अभिनेत्री ची भूमिका साकारत आहे.
बार्शी सोलापूरचे रमाकांत सुतार हे खलनायकाची भूमिका करीत आहेत .सह खलनायकाच्या भूमिकेत प्रकाश धिंङले व सुनील साबळे . फुलचंद नागटिळक आहेत सह अभिनेत्री म्हणून महेक सथ्यद व सोनाली साळुंखे आहे.सहअभिनेता म्हणून नितीन पाटील भूमिका करीत आहे. छायांकन रवी लोहकरे व मारूती ताईनाथ करीत आहे. चित्रपटाचे सह निर्मिता मानसी बळवंत व दिपक गायकवाड आहेत तर शरद गोरे व प्रकाश धिंङले हे चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेमरंग हया चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर गोरे यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे.