Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपातीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राहुल गांधी यांची टीका

Spread the love

केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी टीका केली आहे. याआधी राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या मोदींच्या कार्यक्रमावरुन टोला लगावला होता. मोदींनी तिथे भारताच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताला भेडसावणाऱ्या मंदीवर मात करण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देत टॅक्समध्ये कपात करण्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी या निर्णयाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाशी जोडला आहे. तसंच कोणताही मोठा कार्यक्रम किंवा निर्णय भारताची आर्थिक परिस्थिती लपवू शकत नाही असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “‘#HowdyIndianEconomy दरम्यान खाली जात असलेल्या शेअर बाजारासाठी नरेंद्र मोदी जे करत आहेत ते जबरदस्त आहे. १.४ लाख कोटींच्या खर्चासहित ह्युस्टन येथे होणारा कार्यक्रम जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा कार्यक्रम आहे. पण कोणताही कार्यक्रम भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट लपवू शकत नाही”.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!