Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

यू. पी. एस. मदान : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त

Spread the love

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव राहिलेले यू.पी.एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे.

मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल पूर्ण झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!