Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी घेतली पाच लाखांची लाच , उपसंचालकासह चौघे अटकेत

Spread the love

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

एसटी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतीलाल सोनकवडे, विधिअधिकारी शिवाप्रसाद मुकुंदराव काकडे, खासगी चालक विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन आणि लॅब बॉय मच्छिंद्र मारुती गायकवाड या चार संशियत आरोपींनी एका व्यक्तिकडून पंचासमक्ष पाच लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर विनायक महाजन आणि मच्छिंद्र गायकवाड यांनी ५ सप्टेंबर रोजी शिर्डीतील हॉटेल साई आसरा हॉटेलमध्ये ही रक्कम स्विकारली असता अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणात रामचंद्र सोनकवडे आणि शिवाप्रसाद काकडे यांचाही सहभाग असल्याचं आढळून आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येणरा असल्याचं सांगण्यात आले. यातील तीन संशयित आरोपी नाशिकचे रहिवासी असून मच्छिंद्र गायकवाड हा संशयित अहमदनगर येथे राहत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!