Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा , गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी

Spread the love

मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारी मध्यरात्रीपासून ओसरला. मुंबईत पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी गुरूवारी दिवसभरात राज्यात अनेक भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, गडचिरोलीमध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी उद्यापासून (शुक्रवार) नऊ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. अतिमहत्त्वाची कामे असल्यासच घराबाहेर पडावे, असाही इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारीदेखील मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे आज हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांना किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मुंबईकरांनाही गरज पडल्यासच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. खरंतर गेल्या काही दिवस पावसाने चांगलीच दडी मारली होती. पण राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत बहुतांश भागात पाऊस असाच सक्रिया राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुसळधार पावसाचा फटका रस्तेसह रेल्वे वाहतुकीला बसला होता. सायन-कुर्ला-चुनाभट्टीदरम्यान ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा इशारा पाहता मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!