Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mob Lynching : मुलं पळवणारी समजून जमावाने केला गर्भवती महिलेवर हल्ला

Spread the love

मुलं पळवणारी समजून जमावाने २५ वर्षीय गर्भवती महिलेवर हल्ला करत बेदम मारहाण केली. ही महिला पाच महिन्यांची गर्भवती असून तिच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

गेल्या महिनाभरापासून पश्चिम उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीत चोरणाऱ्या टोळीची अफवा या भागात असून, जमावाकडून हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल २० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर पूर्व दिल्लीतील हर्ष विहारमध्ये मुलं चोरणारी समजून एका गर्भवतीवर दहा जणांनी हल्ला केला. मूकबधिर आणि कर्णबधिर असलेल्या महिलेला लोकांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हल्ला करणाऱ्यांपैकी दीपक (२७), शकुंतला (५२) आणि ललित कुमार (२९) या तीन जणांना अटक केली असल्याचे पोलीस म्हणाले. हल्लात जखमी झालेल्या महिलेचे नाव प्रियंका आहे. तिच्यावर सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

“प्रियंकाचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे. त्यानंतर ती दक्षिण पश्चिम दिल्लीतील तुघलाबाद येथून फरिदाबादला स्थायिक झाली होती. अचानक ती बेपत्ता झाल्याचे तिच्या सासरच्या मंडळींनी आम्हाला कळवले. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार दिली होती. १०-११ दिवसांनी प्रियंकावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ आमच्या मित्राने पाहिला. आम्ही तातडीने पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलीस तिला आमच्याकडे घेऊन आले”, अशी माहिती प्रियंकाचा भाऊ संदीप कुमार याने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!