Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिलांनो सावधान : चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलताना काळजी घ्या , नागपुरात एक दुकानात केले जात होते छुपे व्हिडीओ शूटिंग !!

Spread the love

कोणत्याही कपड्याच्या दुकानात पसंत असलेले कपडे बदलणे आम बात आहे पण नागपूरातलं सर्वात मोठं मार्केट असलेल्या सीताबर्डीत उघडकीस आलेल्या चेंजिंग रूम प्रकरणाची पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी गंभीर दखल घेतलीय. असे गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आता एक विशेष तपास पथक तयार केलं आहे. हे पथक विविध मॉल, शॉप्स आणि अन्य आस्थापनांना आकस्मिक भेट देऊन तेथील चेंजिंग रूमची झडती घेणार आहे. एका मॉलमधल्या महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल फोन आढळल्याने खळबळ उडाली होती. तरुणींचे अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आल्याचंही पोलिसांना आढळून आलं होतं.

प्रत्येक मोठ्या मॉल्समध्ये चेंजिंग रूम्स असणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. कपडे विकत घेतल्यानंतर ते ट्राय करून पाहण्यासाठी या रूम्स वापरल्या जातात. मात्र नागपुरातल्या एका मॉलमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून अश्लिल व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. सीताबर्डीतील फ्रेण्डस् या कपड्याच्या दुकानातील महिलांच्या चेंजिंग रूममध्ये हा विकृत प्रकार उघडकीस आला.

रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविणाऱ्या युवतीचा अश्लील व्हिडीओ बनविला गेल्याचे त्यातून उघडकीस आलं. सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन दुकानमालक किसन इंदरचंद अग्रवाल तसेच निखील ऊर्फ पिंटू दीपक चौथमल या दोघांना अटक करण्यात आली होती. या आधीही असे गैर प्रकार उघडकीस आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या पथकाने माल्समध्ये जाऊन झडती घ्यायला सुरुवात केली असून मॉल्सच्या मालकांनी काय उपाय योजना करायच्या याच्या सूचनाही केल्या आहेत. दुकानातली सर्व जबाबदारी ही मालकाची असून गैरप्रकाराला त्यांनाच जबाबदार धरलं जाईल असंही पोलिसांनी बजावलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!