Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सांगली : पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता

Spread the love

मुख्यमंत्री कोल्हापूर ऐवजी आधी सांगलीला जाणार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून सांगली जिल्ह्य़ातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्हय़ातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.मुख्यमंत्री सकाळी विशेष विमानाने कोल्हापूरला जाणार होते. मात्र दौऱ्यात बदल करण्यात आला असून प्रथम सांगलीकडे रवाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी सोबत महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत.


आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. दरम्यान सांगलीमध्ये पुरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट पलटली असून १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमधील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनसुार, ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या ३० नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाली. बोट पलटी झाल्याने १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. इतर १६ जणांचा शोध सुरु आहे. हे बचावकार्य एनडीआऱएफकडून नाही तर स्थानिक तरुणांकडून सुरु होतं असंही कळत आहे. यावेळी लाइव्ह जॅकेट नसल्यानेच लोक आपला जीव वाचवू शकले नाहीत.

गेल्या तीन दिवसांपासून पुराने विळखा घातलेल्या सांगली शहराला बुधवारी कृष्णा-कोयनेच्या पाण्याने संपूर्ण वेढा घातला. या महाप्रलयामध्ये संपूर्ण सांगली शहर बुडाले असून हजारो घरे-दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सांगलीबरोबरच जिल्ह्य़ातील वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा तालुक्यांतील नदीकाठची गावेही पुराने प्रभावित झाली आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या तब्बल ६० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अद्याप हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकून पडलेले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि लष्कराच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. होडय़ांची कमतरता, संपर्काचा अभाव, खंडित वीजपुरवठा या अडचणींचा सामना करत हे मदतकार्य सुरू असले तरी या आपत्तीवेळी जिल्ह्य़ातील सर्व लोकप्रतिनिधींपासून ते सामान्य जनतेतून येणाऱ्या मदतीद्वारे संकटांचा सामना केला जात आहे. कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात पडत असलेला मुसळधार पाऊस यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून बुधवारी सायंकाळपर्यंत सांगलीतील आयर्विन पुलाजवळ असलेल्या मापकावर कृष्णा नदीतील पाण्याने ५५ फुटाची पातळी गाठली. कृष्णेचे पाणी बुधवारी महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारात पसरले असून, ते थेट स्टेशन रोडवरील विठ्ठल मंदिरापर्यंत पोचले आहे. सांगलीला जोडणारे तासगाव आणि मिरज वगळता सर्व मार्ग बंद झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!