Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu & Kashmir : संचारबंदी असतानाही विशेष बंदोबस्तात बकरी ईद साजरी करण्यास राज्यपालांकडून परवानगी

Spread the love

कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी जम्मू-काश्मीरमध्ये ईद साजरी होणार आहे. या संबंधीचे आदेश राज्यपाल सत्यपाल मलिकयांनी जारी केले आहेत. त्यामुळे येथील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.  राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना बकरी ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात बकरे खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी मंडया उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ईदच्या दिवशी रेशन दुकान, मेडिकल स्टोअर्स आणि खाद्यपदार्थांची दुकानं उघडण्याची परवानगीही दिली आहे.

जम्मू-काश्मीरचे जे विद्यार्थी इतर राज्यांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना जर ईदनिमित्त घरी यायचं असेल तर त्यांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जे विद्यार्थी बकरी ईदच्या दिवशी घरी येऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थांसाठी सण साजरा करण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्याचे आणि या कार्यक्रमांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक-एक लाख रुपये देण्याचे आदेशही राज्यपालांनी दिले आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता यावा म्हणून पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात टेलिफोन बुथ ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!