Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे २७ जणांचा मृत्यू तर दोन लाख लोकांचे स्थलांतर : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Spread the love

पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत २७ जण मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. त्यानुसार या धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. कोल्हापूरमधील पाणी पातळी कमी होत असली, तरी सांगलीत पाणी पातळी वाढली आहे, असे म्हैसेकर यांनी सांगितले.

सांगलीमध्ये सध्या सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक पुरात अडकले असण्याची शक्यता आहे. तर, कोल्हापूरमध्ये १७ ते १८ हजार नागरिक पुरात सापडले आहेत. कोल्हापूर आणि सांगली येथे पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मुंबईहून दोन हेलिकॉप्टर मागवण्यात आले आहेत. सध्या एक हेलिकॉप्टर कार्यरत आहे, अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २ लाख ५ हजार ५९१ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये सांगली आणि कोल्हापूरमधील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नपदार्थ पुरवण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!