Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ताजी बातमी : तब्बल १५ तासांपासून थांबलेली मुंबई-गोवा वाहतूक संथ गतीने सुरु

Spread the love

तब्बल १५ तासांपासून ठप्प असलेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, वाहतूक खूपच संथ गतीनं सुरू असून परिस्थिती पूर्ववत होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
कोकणात पडणार्‍या मुसळधार पावसामुळं सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काल रात्रीपासून खेड येथील जगबुडी नदीला ओसंडून वाहू लागली. या नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदी पुलावरील वाहतूक रात्री ८ वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. तसंच, आज पहाटे चिपळूण येथील वाशिष्ठी नदीला देखील पूर आला. त्यामुळं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल १५ तास ही वाहतूक बंद होती. परंतु आता पाणी ओसरल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

कोकण रेल्वे वाहतूक मात्र ठप्प

मुंबई-गोवा हायवे सुरू झाला असला तरी माणगावजवळ घोड नदीला पूर आल्यामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दोन तासांपासून वाहतूक ठप्प असून ती पूर्ववत होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!