Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ११७ जणांची सुटका, २ हजार प्रवासी अडकले, NDRF चे बचाव कार्य वेगात सुरु

Spread the love

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये ११ तासांपासून अडकलेल्या प्रवाशांचं बचावकार्य सुरू

राज्य शासनाच्या कंट्रोल रुमने ट्विटकरून महालक्ष्मी एक्सप्रेसबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मदतकार्य प्रवाशांपर्यंत पोहोचले असून अद्याप ११७ जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे.


येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण परिसरात शुक्रवारपासून (२६ जुलै) मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शनिवारी (२७ जुलै) आणि रविवारी (२८ जुलै) देखील मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.


ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणी परिसरात झालेला तुफान पाऊस आणि पुराचं पाणी रेल्वे रुळांवर आल्यानं ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ बदलापूरजवळ अडकून पडली आहे. गाडी नदीच्या जवळच असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. पाण्याची पातळी वाढतच असून पाणी गाडीत शिरण्याची चिन्हे असल्यानं प्रवासी घाबरून गेले आहेत. नौदलाची आठ पथके दोन हेलिकॉप्टर्ससह मदतीसाठी पोहोचली आहेत.

वांगणीतील रेल्वे रुळांवर दोन फुटांपेक्षाही जास्त पाणी साचल्यानं महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. या गाडीत सुमारे २ हजार प्रवासी असल्याचं समजतं. रेल्वे प्रशासनानं तातडीची मदत मागितल्यानंतर मुंबईतून एनडीआरएफचे ४० जणांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांच्यासोबत ५ बोटी आहेत. मात्र, रस्त्यांवरही पाणी असल्यानं मदतीत अडथळे येत आहेत. पाण्याच्या पातळीत उत्तरोत्तर वाढ होत असून पाणी गाडीत शिरण्याची शक्यता आहे. पाण्याबरोबर साप व अन्य प्राणीही गाडीत शिरण्याच्या शक्यतेनं प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळं या प्रवाशांना एअरलिफ्ट करण्याचा विचार प्रशासन करत आहे. स्थानिक सामाजिक संस्थांनाही रेल्वे प्रशासनानं मदतीसाठी आवाहन केलं आहे.

अंबरनाथला बी केबिन परिसरात बदलापूरहून आलेली लोकल रात्री १० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत रखडली. त्यात अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एनडीआरएफचे पथक येण्यापूर्वीच रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढले होते. मात्र, अनेक प्रवाशांनी गाडीतच राहणे पसंत केले, अशी माहिती आरपीएफने दिली आहे.

वांगणीतील रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं बदलापूर, कर्जत/खोपोली वाहतूक बंद केली आहे. लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

पाण्याच्या पातळीत उत्तरोत्तर वाढ होत असून पाणी गाडीत शिरण्याची शक्यता आहे. पाण्याबरोबर साप व अन्य प्राणीही गाडीत शिरण्याच्या शक्यतेने प्रवाशांमध्ये भीती वाढली आहे. अंबरनाथला बी-केबिन परिसरात बदलापूरहून आलेली लोकल रात्री १० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत रखडली होती. त्यात अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एनडीआरएफचे पथक येण्यापूर्वीच रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढले होते. मात्र, अनेक प्रवाशांनी गाडीतच राहणे पसंत केले, अशी माहिती आरपीएफने दिली आहे.

वांगणी येथे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून बदलापूर ते कर्जत खोपोली दरम्यानची रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झालेली रेल्वे काल रात्री पुणे रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या मध्य, पश्चिम, हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा २० मिनिटे तर, हार्बर मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा ५ ते १० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही ५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

पुण्यातील धरणक्षेत्रांतही संततधार

मुंबईसह उपनगरात शनिवार मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत किंग्ज सर्कल, सायन, माटुंगा, कुर्ला या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. सायन, परळ येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे बदलापूर-अंबरनाथ येथे पावसाचा हाहा:कार सुरू आहे. उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागल्याने वांगणी, बदलापूर, अंबरनाथ परिसरात पाण्याचं साम्राज्य आहे. तर बदलापूर आणि कर्जत-खोपोली दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हवाई वाहतुकीला फटका

मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा फटका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या हवाई वाहतुकीलाही बसला आहे. यामुळे काही विमाने रद्द, काही विमानांच्या वेळापत्रकांमध्ये बदल तर काही विमानांच्या उड्डाणात उशीर झाला आहे.  वेगवान वारे, कमी दृश्यमानता आणि पाऊस यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी एक ट्विट मार्फत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शाळा आणि कॉलेजना सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही , मात्र संबंधित भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा कॉलेजच्या प्रशासनाने किंवा मुख्याध्यापकांनी योग्य तो निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!