Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : “जय श्रीराम” प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात शहर पोलिसांना यश, तत्काळ कारवाई

Spread the love

औरंगाबाद – जय श्रीराम म्हणण्यास जबरदस्ती भाग पडून  फिर्यादीला मारहाण करून धमकावल्याच्या आरोपवरून काल शहरात  दाखल झालेल्या गुन्ह्यात रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली. अशी माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली आहे.

गणेश विनोद सोनवणे(२१) रा. एन१३ , भरतनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील इतर पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे .  या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सानप म्हणाले कि , सादर आरोपीला गुन्हे शाखेने अटक करून आमच्या ताब्यात दिले आहे . सदरचा गुन्हा घडला त्यावाइल्स त्याच्या सोबत आणखी कोण कोण होते आणि हा गुन्हा त्यांनी का केला ? याविषयी आमचा तपास चालू आहे. लवकरच या प्रकरणामागचे सत्य काय आहे ते उघडकीस येईल.

विशेष म्हणजे परवा रात्री घडलेल्या या गुन्ह्यात काल बेगमपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यासाठी पीडित तरुणासोबत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. सदर प्रकरण शहरात माहित होताच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी तत्काळ व्हिडीओद्वारे शांततेचे आवाहन करून अफवांवर विषावस न ठेवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान खा . इम्तीयाज जलील आणि राज्यमंत्री अतुल सावे यांनीही या प्रकरणी शहरवासियांना  शांततेतेचे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते .

या प्रकरणात शहर गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलिसांनी तत्परतेने तपस करून आज एका आरोपीला अटक करण्यात यश मिळविले असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!