Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न, परराष्ट्रमंत्री जयशंकर

Spread the love

पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्र मंत्री यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्ताननं जाधव यांची सुटका करावी अशी मागणी करतानाच, जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

संपूर्ण देश हा कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांसोबत आहे असं आश्वासन जयशंकर यांनी सभागृहात दिलं. कठीण परिस्थितीत खंबीर राहणाऱ्या जाधव यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी कौतुक केले. या संवेदनशील मुद्द्यावर भारताने मिळवलेल्या विजयानं संपूर्ण सभागृह निश्चितच आनंदी झाला असेल. कठीण परिस्थितीतही जाधव यांच्या कुटुंबीयांनी खंबीर राहून एक आदर्श निर्माण केला आहे. सरकार जाधव यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जाधव यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प २०१७ मध्ये सरकारने संसदेत सोडला होता. सरकारने त्या दृष्टीने अथक प्रयत्न केले. त्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याच्या प्रक्रियेचाही समावेश आहे. सरकारने केलेल्या या प्रयत्नांचे हे सभागृह नक्कीच कौतुक करेल, अशी खात्री आहे. विशेषतः हरिश साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करायलाच हवे, असेही जयशंकर यांनी सभागृहात सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!