Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

या कर्तबगार महिला पोलीस आयुक्तांनी हे सिद्ध केले कि , ” कानून के हाथ सच मे लंबे होते है ….”

Spread the love

आपण नेहमी हा डायलॉग ऐकतो कि , ” कानून के हाथ सच मे लंबे होते है ….”  आणि केरळच्या कर्तबगार महिला पोलीस आयुक्तांनी हे खरोखरच दाखवून दिले कि , सच मे कानून के हाथ लंबे होते है !! त्याचे झाले असे कि , कोल्लमच्या पोलीस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (३८) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीम त्याला आणण्यासाठी सौदीला रवाना झाली. सौदीमधून गुन्हेगाराला आणण्याच्या प्रक्रियेत कितीही अडथळे आले तरी सुनील कुमारला घेऊनच भारतात परतण्याचा निर्धार मेरीन जोसेफ यांनी केला होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे.

मूळचा कोल्लमचा असलेला  सुनील कुमार सौदी अरेबियात टाइल कामगार म्हणून नोकरी करायचा. सुट्टीमध्ये सुनील कुमार केरळमध्ये आला होता. त्यावेळी त्याने मित्राच्या पुतणीचे तीन महिने लैंगिक शोषण केले. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या पीडित मुलीने अखेर तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले.

पोलिसांनी सुनील विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली पण तो सौदी अरेबियाला पळून गेला होता. जून २०१७ मध्ये मुलीने आपले आयुष्य संपवले. त्याआधी मुलीच्या काकांनी ज्यांनी सुनील कुमारची कुटुंबाबरोबर ओळख करुन दिली होती. त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. मेरीन जोसेफ यांनी जून २०१९ मध्ये कोल्लमच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेत असताना महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हा माझ्यासमोर हे प्रकरण आले तेव्हा दोन वर्षांपासून आरोपी फरार होता. लोकांच्या मनात या घटनेबद्दल संताप आहे. आरोपीच्या अटकेसाठी केरळ पोलिसांचा आंतरराष्ट्रीय तपास विभाग सौदी पोलिसांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.

आम्ही या प्रयत्नांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला असे मेरीन जोसेफ यांनी सांगितले. २०१७ सालीच सुनील कुमार विरोधात इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. पण त्यात फारशी प्रगती झालेली नव्हती. इंटरपोलने नोटीस जारी केल्यानंतर पाठपुरावा आणि समोरच्या देशाकडून सहकार्य आवश्यक असते. २०१० साली पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सौदीचे राजे अब्दुल्ला यांच्यामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झाला. केरळमध्ये गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेले अनेकजण सौदीला पळून गेले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी परदेशात आरोपीला अटक करायची असेल तर ज्युनिअर अधिकाऱ्यांना निवडतात पण मेरीन यांनी स्वत: जाण्याचा निर्णय घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!