Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : प्रेयसीच्या नादात कुख्यात कार चोराच्या हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या

Spread the love

औरंगाबाद  येथील तरुणीच्या प्रेमात पडलेला कुख्यात  कार चोर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळयात अडकला .  पुंडलिकनगर पोलिसांनी या चोराला वाळूज एम आय डी सी पोलिसांच्या हवाली केले आहे . पकडण्यात आलेला हा चोर हा आंतरराज्य टोळीचा प्रमुख असून राज्यात सर्व प्रमुख जिल्ह्यात त्याचे साथीदार आहेत. कुख्यात राजेश पाटील, इम्रान, शेख बबू रईस यां कार चोरांना हा कार स्कॅनर सप्लाय करतो.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , पिंदरपालसिंग (३०) रा. पटियाला पंजाब हा औरंगाबादच्या प्रेयसीला अमृतसर मधे भेटला. याचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. तर प्रेयसी फक्त ३ री शिकली आहे. सहा महिन्यांपूर्वी मूळ औरंगाबादचे असलेले प्रेयसीचे वडिल कामधंदा शोधंत अमृतसर मधे कुटुंबासह गेले होते . ते उत्कृष्ट मोटरमॅकेनिक आहेत. तसेच पिंदरपाल सिंग हा सुध्दा छोटा मोटरमॅकेनिक आहे. प्रेयसीच्या वडलांना उस्ताद बनवून पिंदरपालसिंग ने प्रेयसीची ओळंख वाढवली मोबाईल क्रं ची देवाणघेवाण झाली. त्यानंतर सुर जुळले आणि त्याच प्रेयसीच्या ओढीमुळे पंजाब मधून औरंगाबादेत येत वाळूज औद्योगिक परिसरात एक इनोव्हाही चोरली. पण सोमवारी विरह सहन झाल्यामुळे पिंदरपालसिंग ने पुन्हा  औरंगाबादेत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

खबर्‍याने पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे जाधव यांना पिंदरपालसिंग मुकुंदवाडीत आल्याचे कळवले. सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रमेश सांगळे यांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. शहर आणि जिल्हापरिसरातही  त्याचे साथीदार सक्रिय आहेत. सर्व माहिती मिळविल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्याकडे पुंडलिक नगर पोलिसांनी पिंदरपालसिंगला सोपवले असून पुढील तपास एम. वाळूज पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!