Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई: मालाड दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर, मृतांमध्ये अबाल वृद्धांचा समावेश

Spread the love

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. तर ७९ जण जखमी आहेत. या भयावह दुर्घटनेत मृत्यू ओढावलेल्या २२ जणांपैकी १५  जणांची ओळख पटली असून त्यांची नावं प्रशासनानं जारी केली आहेत. जर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुर्घटनेतील मृत्युमुखींची नावं- 
सरवन गौड(२०), सानिका सुर्वे (१४), जान्हवी कनोजिया (०१), सीमा पैठणे (०६), नमिता (२८), किशोर शर्मा (६०), सोनाली (१९), सिद्धी (३०), लक्ष्मण (४०), परशुराम (३), दत्ता जाधव (५०), मुन्नीदेवी पटेल (२८), पालबीदेवी पटेल (२), प्रलीमा गौतम (२), मरीअम गौतम (४)

दरम्यान, या दुर्घटनेनंतर याठिकाणच्या दोन इमारतींना धोका संभावण्याची शक्यता असल्याने इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

मुलुंडमध्ये भिंत पडून एक ठार

मुलुंडच्या फाल्गुनी सोसायटीतही भिंत कोसळल्याची घटना घडली. सततच्या पावसामुळे सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. यात भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सोसायटीचा सुरक्षारक्षक करी सिंग (४५) याचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!