Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates Live : World cup 2019 IND vs BAN Live: भारताचे बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य, शाकिबची झुंजार अर्धशतकी खेळी

Spread the love

बांगलादेश                228/6 (40.5)

सब्बीर रेहमान*                 31/ 27

मोहम्मद सैफुद्दीन *         20/ 21

शाकिब अल हसन   (Out)      63/ 68

मोसादैक होसैन    (Out)          3/ 5

लिटोन दास *      ( Out )            22/ 22

भारत                314/9 (50.0)

बांगलादेशला चौथा धक्का; लिटन दास झेलबाद

महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांमध्ये धावा वसुल करण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारस यश आलं नाही. धोनीने ३३ चेंडूत ३५ धावा केल्या. पुढे शमी(१), भुवनेश्वर कुमार(२) हे स्वस्तात बाद झाले. ५० षटकांच्या अखेरीस भारताला ९ बाद ३१४ धावा करता आल्या. 

पुढे ऋषभ पंतने ४१ चेंडूत ४८ धावा करत सामन्यात रंगत आणली होती. पण दिनेश कार्तिकनं निराशा केली. कार्तिक अवघ्या ८ धावा करून तंबूत दाखल झाला.

हार्दिक पंड्या शून्यावर माघारी परतला

मुंबईः तब्बल १६ तासांनंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू

मुंबईः डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहर यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्ट ४ जुलैला घेणार सुनावणी

वर्ल्डकपः रोहित शर्माचं चौथं शतक; माजी क्रिकेटपटू कुमार संघकाराच्या विक्रमाशी बरोबरी, शतक साजरं करताच रोहित बाद

रोहित शर्मापाठोपाठ लोकेश राहुलचंही अर्धशतक, भारतीय संघाच्या धावसंख्येने शतक ओलांडलं

मुंबईः शताब्दी हॉस्पिटलमध्ये ५५ रुग्णांवर उपचार सुरू. यात ४ मुलांचा समावेश. ९ जण मृत घोषित.

वर्ल्डकपः बांगलादेशविरूद्ध भारतानं टॉस जिंकला. कुलदीप यादव, केदार जाधवला विश्रांती. भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिकला संघात स्थान.

वर्ल्डकपः बांगलादेशविरूद्ध भारतानं टॉस जिंकला. आजच्या सामन्यात भारतीय संघात तीन यष्टीरक्षक

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्याचा दिल्लीत आत्महत्येचा प्रयत्न .

पुढील ४८ तासात मुंबई पुण्याबरोबरच मराठवाडा , विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता . पर्यटकांना पर्वत भागात न जाण्याच्या सूचना.

ठाणे , पालघरमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता , कुलाबा वेधशाळेचा अंदाज .

मुंबईः अंधेरीतील मिलन सबवे येथे कारमध्ये अडकलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू. दरवाजा, खिडकी उघडण्याचा प्रयत्न अयशस्वीः

मुंबईः मालाडमधील भिंत दुर्घटना प्रकरण, मृतांचा आकडा १९ वर तर जखमींची संख्या ७४ वर पोहोचली.

मुख्यमंत्री म्हणतात …महिन्याभराचा पाऊस तीन दिवसात पडला

नालेसफाई झाली नाही, असं म्हणता येणार नाही. जास्त पाऊस झाल्याने मुंबई तुंबलीः मुख्यमंत्री.

मुंबईः सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेनेही मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करावीः मुख्यमंत्री.

मुंबईः पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलची वाहतूक पूर्णपणे बंद.

मुंबईः पनवेल ते वाशी वाहतूक सुरू. वाशी सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प.

मुंबईः मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प.

मुंबईः ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू.
मुंबईः साकीनाका पोलीस ठाण्यात पाणी गुडघ्यापर्यंत साचले. पोलिसांची उडाली दैना.

मालाड येथे भिंत कोसळूम मृत्यू झाल्याबद्दल दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. पावसाची स्थिती हाताळण्यास मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. नियमांची पायमल्ली होत आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे. नाले सफाई दौऱ्यांचाही काही उपयोग झालेला नाही. गरज असेल तर महापालिकेवर प्रशासक नेमा असे म्हणत आक्रमक झालेल्या अजित पवार यांनी यावेळी मुंबई महानगरपालिकाच बरखास्त करा अशी मागणी केली. मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांचे पडसाद मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या विषयावरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.

मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांचे पडसाद मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या घटनांसाठी राज्य सरकारला धारेवर धरत आरोप केले. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या स्थितीला मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. यानंतर विधानसभेत मुंबईतील पावसानंतर निर्माण झालेल्या चर्चेवर विशेष चर्चा घेण्यात आली.

विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पावसानंतरच्या स्थितीवरून सरकारला धारेवर धरले. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या स्थितीला मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. या वेळी कोंढव्यात निरपराध लोकांचे बळी गेल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मालाड दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केली. या दुर्घटनेला महानगर पालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत का, तसेच एसआरएचे अधिकारी जबाबदार आहेत का, याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी भुजबळ यांनी केली.

News Updates Live :

मुंबईवरून नांदेडला जाणारी व नांदेडवरून मुंबईला येणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द. मुंबईला येणारी नंदीग्राम नाशिकपर्यंतच येणार

पुणेः येरवाडा कारागृहात दोन गटात तुफान राडा, जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू. येरवाडा पोलीस कारागृहात दाखल

पुणे: सिंहगड कॉलेजजवळ भिंत कोसळली, ६ ठार. राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२), जितू चंदन रवते (२४), जेटूलाल पटेल (४५) , ममता पटेल (२४) अशी मृत्युमुखींची नावे.

नागपूरः मुंबईमधील मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत. नागपूरवरून निघालेली दुरंतो एक्स्प्रेस मनमाडजवळ ५ तासांपासून रखडली. प्रवासी खोळंबले, काही प्रवाशांनी वाहनांनी जाणे पसंत केले.

कोल्हापूर : महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवी गवंडी यांची बिनविरोध निवड.

मुंबईः कळवा के. के. ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न. नऊ दरोडेखोर अटकेत. पाच रिव्हॉल्वर आणि आठ जिवंत काडतूस जप्त.

नागपूरः मुसळधार पावसामुळे डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मूर्ती मंदिरासमोरील रेशिमबाग मैदानावर तलावप्रमाणे पाणी साचले.

पुणेः मध्य रेल्वेची सेवा कोलमंडल्याने प्रवाशांची लोणावळा एसटी बस स्थानकात प्रचंड गर्दी.

नाशिकः पाण्याची टाकी कोसळली; तीन मजुरांचा दबून जागीच मृत्यू. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केली घटनास्थळाची पाहणी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!