Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Kodhva Mishap : दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ८ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Spread the love

पुण्यातील कोंढवा भागातील अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ८ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅल्कॉन लँडमार्क्सचे बिल्डर जगदीशप्रसाद अगरवाल, सचिन अगरवाल, राजेश अगरवाल, विवेक अगरवाल, विपुल अगरवाल तसेच कांचन सोसायटीचे बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मिकांत शहा व साइट इंजिनिअर, साइट सुपरवायजर, लेबर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोंढव्यातील बडा तालाब मस्जिद पसरिसरात अॅल्कॉन स्टायलस ही इमारत असून रात्री १ वाजून ४० मिनिटांनी या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. भिंतीला लागूनच मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अॅल्कॉन स्टायलस सोसायटीच्या बाजूलाच इमारतीचं काम सुरू होतं. इमारतीचा पाया बांधण्यासाठी ४० ते ५० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या अॅल्कॉन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या. पण पावसामुळे सोसायटीची पार्किंगची संरक्षण भिंत खचून ही दुर्घटना घडली आणि त्यात १५ जणांचा बळी गेला. हे सर्वजण बिहारमधील होते.

दुर्घटनेतील मृतांची नावे :

१. आलोक शर्मा (२८)
२. मोहन शर्मा (२४)
३. अमन वर्मा (१९)
४.रवी वर्मा (१९)
५. लक्ष्मीकांत सहाणी (३३)
६. सुनील सिंग (३५)
७. भिमा दास (३८)
८. दिरंजन शर्मा (३०)
९. संगीता देवी (२६)
१०. निवा देवी (३०)
११. ओवी दास (६)
१२. सोनाली दास (८)
१३. अजितकुमार शर्मा (७)
१४. रावलकुमार शर्म (५)
१५. अवदेश सिंग (३४)

जखमींची नावे :

१. पूजा देवी (२८)
२. अजम शर्मा (१९)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!