Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईच्या पावसाळा वायू चक्रीवादळाचा फटका, पाऊस सात दिवस लांबणीवर

Advertisements
Advertisements
Spread the love

वायू चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला नसला तरी वायू चक्रीवादळाचा परिणाम हा मान्सूनवर झाला आहे. कारण, मुंबईकरांना आणखी 7 दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्यानं त्याबाबतची माहिती दिली आहे. गुरूवारी मुंबईला चक्रीवादळाचा धोका असल्याची माहिती देण्यात आली होती. पण, हा धोका टळला होता. महाराष्ट्र, गुजरातसह किनारी राज्यांना याबाबत सतर्क करण्यात आलं होतं. वायूमुळे गुजरातमध्ये 6 जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. मुंबईला असलेला धोका टळला असला तरी मान्सूनच्या प्रगतीवर मात्र त्याचा परिणाम झाला आहे.

Advertisements

आठवड्याभरापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याची राज्याला आता प्रतिक्षा लागून राहिली आहे. 13 ते 14 जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे मात्र मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला असून मुंबईकरांना आणखी आठवडाभर वाट पाहवी लागणार आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. शिवाय, उकाड्यानं देखील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

Advertisements
Advertisements

संपूर्ण राज्यात मान्सून अद्याप तरी सक्रिय झालेला नाही. पण, मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक या भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!