Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बॅलेट पेपरवर निवडणुकीसाठी याचिका; तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Spread the love

EVM द्वारे निवडणुका घेण्याबाबत दिवसेंदिवस होणारा विरोध वाढताना दिसत आहे. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. निवडणुका बॅलेट पेपरने घेण्यासंदर्भातील याचिका मनोहर शर्मा यांनी दाखल केली होती. यावर तात्काळ सुनावणीची मागणी देखील मनोहर शर्मा यांनी केली होती. पण, याचिकेवर तात्काळ सुनावणीस मात्र सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यापूर्वी देखील EVMबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. सत्ताधारी भाजप EVM मशिन हॅक करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत EVM आणि VVPATमधील 50 टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती. तर, निकालानंतर नारायण राणे, शरद पवार, अजित पवार, तसंच काँग्रेसच्या काही नेत्यांनी EVMमध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता.

काही ठिकाणी ईव्हीएम हॉटेलमध्ये देखील आढळून आले होते. त्याआधारे देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. शिवाय, EVM बाबत यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, हाणगणंगले मतदारसंघात EVM आणि VVPATमधील मतांमध्ये तफावत आढळून आली होती. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपला आक्षेप देखील नोंदवला होता. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह आणखी 2 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर आता न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!