Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात

Spread the love

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसने विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड केली आहे.  काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आमदार नसीम खान यांच्याकडे विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यातच विधानसभा निवडणुकाही जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!