Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup 2019 : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडने मारली बाजी

Spread the love

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडने बाजी मारली आणि वर्ल्डकपमधील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ओव्हल मैदानावर रंगलेला हा सामना प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरला. २४५ धावांचे माफक लक्ष्य पदरी असतानाही बांगलादेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडचे नाकीनऊ आणले. त्यात रॉस टेलरची ८२ धावांची संयमी खेळी निर्णायक ठरली आणि न्यूझीलंडने २ गडी राखून बांगलादेशवर निसटता विजय मिळवला.

मॅट हेन्रीच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला ४९.२ षटकांत २४४ धावांत रोखले. २००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या शकिबने अर्धशतक ठोकले. या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना अधिक वेळ मैदानावर स्थिरावता आले नाही. हेन्रीने चार बळी मिळवले. केनिंग्टन ओव्हल येथे ही लढत झाली. दोन्ही संघांनी सलामीच्या लढतीत आपापल्या प्रतिस्पर्ध्याला नमविले होते.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तमिम इक्बाल आणि सौम्य सरकारने बांगलादेशला ८.३ षटकांत ४५ धावांची सलामी दिली. मात्र, सौम्य सरकार आणि तमिम एकापाठोपाठ बाद झाले. यानंतर शकिबने रहीमच्या साथिने डाव सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी रचली. रहीमला मात्र अधिक वेळ शकिबला साथ देता आली नाही. ३१व्या षटकात शकिब बाद झाला. त्याने ६८ चेंडूंत ७ चौकारांसह ६४ धावा केल्या. यानंतर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. महंमद मिथुन आणि महंमुदुल्ला यांनाही फटकेबाजी करता आली नाही. महंमद सैफुद्दीनने २३ चेंडूंत २९ धावा केल्या. अखेरच्या षटकात हेन्रीने मश्रफे मोर्तझा आणि सैफुद्दीन यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून बांगलादेशला ४९.२ षटकांत २४४ धावांत रोखले. बांगलादेशने सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली होती. या वेळी मात्र त्यांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेता आला नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!