Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup 2019 : चहलचा चौकार ! दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावांचे टार्गेट

Spread the love

वर्ल्ड कप सुरू होऊन एक आठवडा झाला असला तरी, भारत आज आपला पहिला सामना खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 228 धावांचे धावांचे आव्हान भाराताला दिले आहे. मात्र त्यांचा हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीच अयशस्वी ठरवला तर, भारतासाठी हा निर्णय यशस्वी ठरला.

पहिल्या ओव्हरपासून भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नियंत्रण ठेवले. बुमराहनं आपल्या तीन ओव्हरमध्येच दक्षिण आफ्रिकाच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडले. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला. तर, अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर चहलनं ड्युप्लेसिस आणि रॉसी वान डेर डुसेन यांना एकाच ओव्हरमध्ये माघारी पाठवले. त्यानंतर कुलदीपनं जेपी ड्युमिनीलाही माघारी धाडले. मात्र त्यानंतर आपल्या संघाला डेव्डिड मिलर आणि एंडिले फेलुक्वायो यांनी संयमी फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर धोनीनं धान साधत एंडिले फेलुक्वायोला बाद केले. भारताकडून चहलनं 4, कुलदीप यादवनं आणि भुवनेश्वर कुमारनं, बुमराहनं 2 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तळाला आलेल्या क्रिस मॉरिसनं सर्वात जास्त धावा केल्या. तर, कर्णधार ड्यु प्लेसिसिनं 38 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.

भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार.
द. आफ्रिकेचा संघ : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), क्वींटन डीकॉक, एडेन मार्करम, हाशिम अमला, रॉसी वान डेर डुसेन डेव्हिड मिल्लर, जेपी ड्युमिनी, कागिसो रबाडा, एंडिले फेलुक्वायो, तबरेज शम्सी, ख्रिस मॉरिस.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!