Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत मोदी -इम्रान खान यांच्यात बैठक नाही

Spread the love

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट होणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सोहेल महमूद यांच्या भारतदौऱ्यानंतर या भेटीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या महिन्याच्या १३-१४ तारखेला किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे ही परिषद होत आहे. या परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी ते आपल्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या दौऱ्यावर मालदीवला रवाना होणार आहेत. हा दौरा ८ आणि ९ जूनला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘बिश्केकमध्ये SCO परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात बैठकीचा कोणताही कार्यक्रम नाही.’ पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांचा भारत दौरा त्यांचा वैयक्तिक दौरा होता, असं रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!