Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aus vs WI : ऑस्ट्रेलियाचं वेस्ट इंडिजसमोर २८९ धावांचं आव्हान

Spread the love

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २८९ धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कूल्टर नाइलनं सर्वाधिक ९२ धावांची खेळी साकारली. तर स्टीव्ह स्मिथने ७३ धावांचं योगदान दिलं.
सामन्याची नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुरुवातीला चांगलीच वेसण घातली होती. अवघ्या ७९ धावांत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत दाखल झाला होता. ऑस्ट्रेलियाचा डाव १५० धावांच्या आत संपुष्टात येईल असंच चित्र होतं. स्टीव्ह स्मिथनं संघाच्या धावसंख्येला आकार देत मैदानात जम बसवला आणि धावफलक हलता ठेवला. स्मिथला अॅलेक्स कॅरीने(४५) चांगली साथ दिली.

स्मिथनं १०३ चेंडूत ७३ धावांची खेळी साकारली. स्मिथ बाद झाल्यानंतर संघात ८ व्या स्थानी फलंदाजीसाठी आलेल्या नॅथन कूल्टर नाइल याने तुफान फटकेबाजी करत सामन्याचं रूप पालटलं. कूल्टर नाइलने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत ६० चेंडूत ९२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यात ८ चौकार आणि ४ उत्तुंग षटकांराचा समावेश आहे.

कूल्टर नाइलच्या ९२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८८ धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेट याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर ओशान थॉमस, शेल्डन कॉटरेल आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!