Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup 2019 : AUS vs WI : ऑस्ट्रेलियाची वेस्ट इंडिजवर १५ धावांनी मात

Spread the love

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ५० षटकांच्या अखेरीस ९ बाद २७३ धावा करता आल्या. मिचेल स्टार्क आणि नॅथन कूल्टर नाइल हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मिचेल स्टार्कने वेस्ट इंडिजच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडलं. ख्रिस गेल, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, शेल्डन कॉटरेल या महत्त्वाच्या फलंदाजांना स्टार्कने तंबूचा रस्ता दाखवला.

कूल्टर नाइलने फलंदाजीत आपली कमाल दाखवली. कूल्टरने नाइलने ६० चेंडूत ९२ धावांची खेळी साकारली. कूल्टर नाइलच्या ९२ आणि स्टीव्ह स्मिथच्या ७३ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २८८ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवर एव्हिन लुइस(१) स्वस्तात माघारी परतला. पुढे ख्रिस गेलने सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. मिचेल स्टार्कने गेलची विकेट काढली. ख्रिस गेलनं १७ चेंडूत २१ धावा केल्या. शाय होप(६८) आणि निकोलस पूरन(४०) यांनी संघाचा डाव सावरला. हे दोघं बाद झाल्यानंतर कर्णधार जेसन होल्डरने अर्धशतकी खेळी साकारून विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. स्टार्कने होल्डरला बाद केल्यानंतर सामन्यात ऑस्ट्रेलियात पारडं जड झालं. अखेरच्या षटकात अॅश्ले नर्सने लागोपाठ चार चौकार ठोकले पण तोवर वेळ निघून गेली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!